पंकजाताईंना चष्मा लागला… पण अँगल राजकीय? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल, बघा स्पेशल रिपोर्ट
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जवळचा चष्मा लागलाय. बातमी ही नाही तर चष्मा लागला असल्याचे जे पंकजा मुंडे यांनी सांगितलं त्यांची सध्या चर्चा होतेय. आमच्या पप्पांनी गणपती आणला... या गाण्याच्या चालीला पंकजा मुंडे यांनी नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून एक व्हिडीओ तयार केला आहे.
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जवळचा चष्मा लागलाय. बातमी ही नाही तर चष्मा लागला असल्याचे जे पंकजा मुंडे यांनी सांगितलं त्यांची सध्या चर्चा होतेय. पकंजा मुंडे यांनी स्वतः एक व्हिडीओ करून याबद्दलची महिती दिली आहे. आणि तोच व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. पण पंकजा मुंडे काही म्हणाल्या आणि त्यांचे राजकीय अँगल निघाला नाही तर नवल…पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आधी जवळचं चांगलं दिसत नव्हतं आता स्पष्ट दिसायला लागलंय. याच विधानावरून राजकीय चर्चा सुरू झाल्यात. गणेशोत्सवादरम्यान, साईराज नावाच्या मुलाचं गाणं जोरदार व्हायरल झालं होतं. या मुलाचं महाराष्ट्रभर कौतुक झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही त्याची भेट घेतली होती. आता त्याच गाण्यावर त्यांनी चष्मा लागल्याची माहिती दिलीये.
Published on: Nov 23, 2023 10:20 AM