Nitesh Rane | मुख्यमंत्र्यांकडून युतीचं वक्तव्य लक्ष विचलित करण्यासाठी ? नितेश राणेंचा सवाल
मातोश्रीच्या अंगणातच एमएमआरडीएचा पूल कोसळला आहे. त्यामुळे आपलं अपयश झाकण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी भाजप मंत्र्यांना भावी सहकारी म्हणत लक्ष विचलीत केल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना भावी सहकारी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. मातोश्रीच्या अंगणातच एमएमआरडीएचा पूल कोसळला आहे. त्यामुळे आपलं अपयश झाकण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची कुठेही चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष भाजपला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. आता स्वत:चं अपयश झाकण्यासाठी भावी सहकारी म्हटलं जात आहे. मातोश्रीच्या नजरेसमोरच एमएमआरडीएचा पूल कोसळला. त्याचं अपयश झाकण्याचा हा प्रयत्न आहे. या अपघातात कितीतरी मजूर जखमी झाले आहेत. सरकारच्या यंत्रणेचं हे अपयश आहे. उद्या जर मोठा अपघात झाला असता तर? असा सवाल नितेश राणे यांनी केला.