Pune | दुचाकीच्या समोरच्या भागात शिरला नाग, समोरील भाग खोलून नागाला बाहेर काढले
बाईकच्या हँडलवरील भागात अचानक नाग शिरल्याची घटना पुण्याजवळील इदांपूर गावात घडली. त्या नागाला सुखरुपरित्या एका सर्पमित्राने जीवदान दिलं.
बाईकच्या समोरच्या भागात शिरलेल्या नागाची सुटका करण्यात यश आलं आहे. सर्पमित्राने बाईकमध्ये अडकलेल्या पाच फुटांच्या कोब्राला सुखरुप वाचवलं. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी भागात हा प्रकार घडला. नागाच्या सुटकेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.