Sanjay Raut | अमित शाह गृहमंत्री असल्याने शरद पवार शाहांच्या भेटीला : संजय राऊत
अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील बहुचर्चित भेटीवर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर भाष्य केले. अमित शाह हे सहकार खात्याचे मंत्री आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांनी शाहा यांची भेट घेतल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यानंतर या विषयावर अधिक बोलणे संजय राऊत यांनी टाळले.