Nagpur | नागपुरात सुरक्षारक्षकांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षारक्षकांकडं असते. ड्युटी करण्याच्या जागेवर दारू पार्टी करत असतानाचा हा व्हिडिओ असल्यानं इथली सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.
नागपूर : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी सुरक्षेला भगदाड पाडले. सुरक्षा रक्षकांच्या दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षारक्षकांकडं असते. ड्युटी करण्याच्या जागेवर दारू पार्टी करत असतानाचा हा व्हिडिओ असल्यानं इथली सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे.
कामाच्या ठिकाणी दारू पार्टी करणाऱ्या सुरक्षारक्षकांना रुग्णालयाचे अधीक्षक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रादेशिक मनोरुग्णालय हे 42 एकरवर पसरलेले आहे. परंतु त्या तुलनेत सुरक्षेची जबाबदारी बारा सुरक्षा रक्षकांवर आहे. रुग्णालयातील वॉर्डाकडं जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर वॉर्डातील रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. पण तेच नशेत असतील तर सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो.