थुकणं आणि फुंकर घालणं यातील फरक नेमका काय ? | Shah Rukh Khan

थुकणं आणि फुंकर घालणं यातील फरक नेमका काय ? | Shah Rukh Khan

| Updated on: Feb 07, 2022 | 7:54 PM

पहिल्यांदा शाहरूख खानने प्रार्थना केली आणि वाकून पार्थिव शरिरावर फुंकर मारली, त्यानंतर पुजा दललानीसोबत हात जोडून प्रदक्षिणा घालून खाली स्टेजवरून खाली उतरला. हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

मुंबई : रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकरांनी (lata mangeshkar) ब्रीचकॅन्डी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी अवघ्या जगात पसरली. लोकांनी त्यांना वेगवेगळ्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली. तसेच अनेक नेत्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मुंबईत (mumbai) आले होते. त्यांच्यावरती शिवाजी पार्क (shivaji park) येथील मैदानात शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथं अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी तिथं लता दीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या शाहरूख खान (shahrukh khan) आणि पूजा ददलानी सुध्दा आल्या होत्या. शाहरूख खान आणि पूजा ददलानी हे दोघेही स्टेजवरती पार्थिवाला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र चढले. पहिल्यांदा शाहरूख खानने प्रार्थना केली आणि वाकून पार्थिव शरिरावर फुंकर मारली, त्यानंतर पुजा दललानीसोबत हात जोडून प्रदक्षिणा घालून खाली स्टेजवरून खाली उतरला. हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.