Viral Video : भाजी खरेदी करताना सावधानी बाळगा, अन्यथा होईल फसवणूक
व्हिडीओमध्ये दाखवलेला प्रकार नागरिकांच्या आरोग्याला मात्र घातक असाच आहे. त्यामुळे बाजारातून घरी आलेल्या पालेभाज्या आता तपासून घेणं गरजेचं झालंय.
मुंबई : जर तुम्ही बाजारातून हिरव्यागार पालेभाज्या घरी आणत असाल तर सावधान. कारण तुम्ही घरी आणलेल्या पालेभाज्या हिरव्यागार आणि टवटवीत कशा केल्या जातात, याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आलाय. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, हे जरी स्पष्ट होऊ शकलं नसलं, तरी त्यात दाखवलेला प्रकार नागरिकांच्या आरोग्याला मात्र घातक असाच आहे. त्यामुळे बाजारातून घरी आलेल्या पालेभाज्या आता तपासून घेणं गरजेचं झालंय.