VIDEO : Sambhaji Raje on Vinayak Mete Death | ‘मेटेंच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण’

| Updated on: Aug 14, 2022 | 8:50 AM

आज सकाळी मुंबईकडे येत असताना विनायक मेटेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आज ते मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी मुंबईकडे येत होते. बातम बोगद्याजवळच त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर मेटेंना पनवेल येथील रूग्णायलयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले.

आज सकाळी मुंबईकडे येत असताना विनायक मेटेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आज ते मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी मुंबईकडे येत होते. बातम बोगद्याजवळच त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर मेटेंना पनवेल येथील रूग्णायलयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान त्यांचे निधन झाले. मेंटेंच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया या येत असून संभाजी राजे यांनीही मेटेंच्या निधनाचे दुख व्यक्त करत म्हटले आहे की, ही अतिशय धक्कादायक बातमी आहे, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी नेहमीच मेटे लढायचे. जेंव्हा ते आमदार होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मेटे नेहमीच आग्रही होते.

shiv sangram Vinayak mete passed away: “आमचे विचारप्रवाह वेगळे होते पण मैत्री कायम होती”, रावसाहेब दानवेंनी व्यक्त केली हळहळ
VIDEO : CM Eknath Shinde on Vinayak Mete Death | ‘मराठा समाजासाठी संघर्ष करणारा नेता हरपला’