VIDEO : SuperFast 50 News | 2.30 PM | 28 August 2021
आळे ग्रामपंचायतीचं आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपमध्ये फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशी खोचक टीका सत्तार यांनी केली आहे.
महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे. नाव राणे आणि चर्चा मात्र चार आण्याची करतात, अशी खोचक टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे. आळे ग्रामपंचायतीचं आणि शिवसेना शाखेचं उद्घाटन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव भाजपमध्ये फक्त बोलण्यासाठी आहे. त्यांचं नाव जरी राणे असलं तरी ते चर्चा फक्त चार आण्याची करतात, अशी खोचक टीका सत्तार यांनी केली आहे.