विधान परिषदेत मतं फुटण्याची भिती, आमदारांची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, कुणाचा मुक्काम कुठे?

| Updated on: Jul 11, 2024 | 11:22 AM

अवघ्या काही तासांवर विधानपरिषदेची निवडणूक आल्याने सर्वच पक्षांनी हालचाली करण्यास सुरूवात केली आहे. मतांची गणितामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे मतं फुटू नये म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

Follow us on

गुप्त मतदानामुळे आपली मतं फुटू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्यात. शरद पवार यांची राष्ट्रवादी वगळता महाविकास आणि महायुतीचे आमदार मतदान होईपर्यंत हॉटेलमध्येच राहणार आहेत. अवघ्या काही तासांवर विधानपरिषदेची निवडणूक आल्याने सर्वच पक्षांनी हालचाली करण्यास सुरूवात केली आहे. मतांची गणितामुळे आणि क्रॉस व्होटिंगमुळे मतं फुटू नये म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे १२ तारखेपर्यंत आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्येच असणार आहे. भाजपचे आमदार कुलाब्याच्या ताज प्रेसिडंटमध्ये मुक्कामी आहे. वांद्र्यातील ताज लँड्समध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची सोय करण्यात आली आहे तर अंधेरीतील हॉटेल ललीतमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असतील. यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये असणार आहे.