पंकजा मुंडे ते मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेतील 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

| Updated on: Jul 28, 2024 | 12:53 PM

विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

Follow us on

महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. विधानसभेत 11 जागांसाठी उमेदवार असलेल्या 12 उमेदवारांपैकी शेकापच्या जयंत पाटील यांचा दारूण पराभव झाला आहे. तर इतर 11 उमेदवार हे विजयी झाले होते. याच विधान परिषदेतील नवनिर्वाचित 11 आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी पंकजा मुंडे – भाजप, योगेश टिळेकर – भाजप, अमित गोरखे – भाजप, परिणय फुके – भाजप, सदाभाऊ खोत – भाजप, भावना गवळी – शिंदे शिवसेना, कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना, शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस, राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस, प्रज्ञा सातव-काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.