मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारे यांचा अजित पवार विरोधी राग कायम, निवडणूक लढण्यावर ठाम
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरूद्ध लढणार असल्याच्या निर्णयावर विजय शिवतारे ठाम असून त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. मात्र दौंडमध्ये प्रचार सुरू असताना अचानक शिवतारे पुण्यात आल्याने चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले
मुंबई, १६ मार्च २०२४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांचा अजित पवार विरोधी राग कायम आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरूद्ध लढणार असल्याच्या निर्णयावर विजय शिवतारे ठाम असून त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. मात्र दौंडमध्ये प्रचार सुरू असताना अचानक शिवतारे पुण्यात आल्याने चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी उभ्या आहेत म्हणून मतदान करायचं का? अजित पवार यांच्या दादागिरीविरोधात जनता रोष व्यक्त करणार, असं हल्लाबोल विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा केलाय. आणि दुसरीकडे स्वतःचा प्रचारही सुरू केलाय. गुरूवारी विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीसाठी बोलावून घेतलं होतं. तर मुख्यमंत्री वर्षावर तब्बल ६ तास मुख्यमंत्री शिवतारेंची वाट पाहत बसले होते. त्यानंतर शिवतारे निघाले आणि नंदनवन निवासस्थानी ते मुख्यमंत्र्यांना भेटले. जवळपास तासभर यांच्यात बैठक झाली. पण मुख्यमंत्र्यांना शिवतारे यांना शांत करण्यात काही यश आले नाही. बघा स्पेशल रिपोर्ट…