विजय शिवतारेंवर कारवाई होणार? कुणी बजावली नोटीस? काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 26, 2024 | 5:54 PM

आता विजय शिवतारेंवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची बातमी समोर येत आहे. विजय शिवतारे यांने शिस्तपालन समितीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे विजय शिवतारेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी भूमिका मांडल्याने विजय शिवतारेंवर कारवाई होणार?

गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. तर येत्या १२ तारखेला १२ वाजता विजय शिवतारे हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितलंय. यानंतर शिवतारे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अशातच आता विजय शिवतारेंवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची बातमी समोर येत आहे. विजय शिवतारे यांने शिस्तपालन समितीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे विजय शिवतारेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी भूमिका मांडल्याने विजय शिवतारेंवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. जर शिवतारे यांच्यावर कारवाई करायची झाली तर ती शिवसेनेकडून होणार आहे. विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्याकडून कारवाईची संकेत देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा झालेली आहे. महायुतीत जे ठरेल ते सर्वांना बंधनकारक असेल असं गोगावले आणि स्पष्टपणे म्हटले आहे.

Published on: Mar 26, 2024 05:54 PM
गिरीश महाजनांसमोर रक्षा खडसे अन् पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडीओ व्हायरल; काय बिनसलं?
रेकॉर्ड मोडणार, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा… फडणवीसांनी काय व्यक्त केला विश्वास?