मी खूप पुढे गेलोय आता…, विजय शिवतारे यांच्या निर्धारानं अजित पवारांचं वाढलं टेन्शन
अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असं म्हणत शिवतारेंनी अजित पवारांचं टेन्शनच वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी भाजपच्या चिन्हावर लढायची गरज पडली तरी माझी हरकत नाही. मी कमळावर लढायला तयार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढण्यावरून सध्या शिवसेना नेते विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्या शाब्दिक वाक् युद्ध रंगलंय. विजय शिवतारे यांनी आज पुन्हा एकदा बारामतीतून लढण्याचा निर्धार व्यक्त केला. अपक्ष लढण्यापेक्षा कमळाच्या चिन्हावर लढणं चांगलं असं म्हणत शिवतारेंनी अजित पवारांचं टेन्शनच वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. अगदी भाजपच्या चिन्हावर लढायची गरज पडली तरी माझी हरकत नाही. मी कमळावर लढायला तयार आहे. लोकांशी विचारमंथन करून मी या निर्णयाप्रत आलोय. अपक्ष लढणं हा नंतरचा भाग आहे. तर जनता म्हणते की बापू तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे मी आता खूप पुढे गेलोय. आता माघार घेऊ शकत नाही. महायुतीचा माझ्यावरती दबाव आहे. अनेक नेते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझ्यावरती बारामतीतल्या जनतेचा दबाव आहे आणि त्यामुळे आता माघार घेणं शक्य नाही, असेही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.