‘अजित पवार कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत’, ‘या’ नेत्यानं स्पष्टच सांगितलं
VIDEO | 'अजित पवार कर्तबगार मात्र राष्ट्रवादीत....', अजित दादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कुणाचं भाष्य?
पुणे : राजकीय नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजी सुरु असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. तर अजित पवार यांना आपण मुख्यमंत्री करुनच राहू, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे चंगच बांधल्याचे झिरवळ यांच्या वक्तव्यावरून दिसले. अशातच आता माजी मंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत मोठ विधान केले आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे असे राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांना मनापासून वाटत असताना अजित पवार हे राष्ट्रवादीत राहून कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचे विजय शिवतरे यांनी म्हटले आहे. तर अजित पवार हे कर्तबगार नेते आहेत मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले तर ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाची विजय शिवतरे यांनी केल्याचे आज पाहायला मिळाले.