Nagpur | मध्य प्रदेशात होत नसेल तर महाराष्ट्रात ही निवडणूका होणार नाही – विजय वडेट्टीवार

| Updated on: Dec 14, 2021 | 7:02 PM

इंपेरिकल डेटाशिवाय आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे शक्य नाही, अशी भूमिका मध्य प्रदेशने घेतली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात होत नसेल तर महाराष्ट्रातही होणार नाही, अशी भूमिका निवडणुकांच्या बाबतीत काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून जोरदार राजकारण तापले आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे अनेक वर्गातून सध्याच्या निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाचा गुंता सुटेपर्यंत निवडणुका नको, अशी स्पष्ट भूमिका राज्यात काँग्रेसकडून घेण्यात आली आहे. आणि त्यालाच आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला आहे.

इंपेरिकल डेटाशिवाय आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे शक्य नाही, अशी भूमिका मध्य प्रदेशने घेतली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात होत नसेल तर महाराष्ट्रातही होणार नाही, अशी भूमिका निवडणुकांच्या बाबतीत काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा द्यावा, ही मागणी आमची आजही आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. चुका आहे असं सांगितलं जातं, फार चुका नाहीत, त्या डेटाच्या आधारावर आरक्षण देता येऊ शकते, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे योग्य नाही

आगामी निवडणुका आरक्षणशिवाय घेणं योग्य होणार नाही, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडता येणार नाही, अशी भूमिका सध्या काँग्रेसने घेतली आहे. सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे, त्या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.

Published on: Dec 14, 2021 07:00 PM
Nawab Malik | भाजप चोर रस्त्याने निवडणुका जिंकतं, पैसे टाकून विकत घेण्याचा नेहमीचा प्रयत्न-मलिक
Sanjay Raut | दिल्लीत सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया