Vijay Wadettiwar : पटोले अन् राऊतांचं नाव घेत वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, ‘मविआ’ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
जागावाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला असल्याचे स्पष्टपणे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले होते. विधानसभेतील झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये वादाच्या ठिणग्या पडण्यास सुरूवात झाली आहे. जागावाटपाच्या घोळामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला असल्याचे स्पष्टपणे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. इतकंच नाहीतर जागावाटपात घोळ सुरू ठेवणं षडयंत्र होतं का? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त करत विजय वडेट्टीवार यांनी हा मोठा आरोप केला आहे. दरम्यान, नाना पटोले आणि संजय राऊत यांचं नाव घेत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधल आहे. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो. परंतु जागावाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता, तर 18 दिवस प्रचारासाठी, प्लानिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलही प्लानिंग करु शकलो नाही, असेही त्यांनी म्हटलंय. बघा व्हिडीओ…