वरून स्क्रिप्ट पाठवली तिच वाचणार, विजय वडेट्टीवार यांची अपात्रतेच्या निकालावर थेट प्रतिक्रिया
'वरून स्क्रिप्ट लिहून पाठवली आहे. तेवढीच वाचायची बाकी आहे. संविधानातील तरतूदी यावर हा निकाल अपेक्षित नाही. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल आला तर सर्वोच्च न्यायालयात तो टिकणार नाही. वरून जे लिहून पाठवलं आहे तो निकाल येणंच अपेक्षित आहे.' विजय वडेट्टीवार यांनी निकालावर स्पष्ट प्रतिक्रिया
मुंबई, १० जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल येण्यासाठी अवघी काही मिनिटे बाकी आहेत. या निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, वरून स्क्रिप्ट लिहून पाठवली आहे. तेवढीच वाचायची बाकी आहे. संविधानातील तरतूदी यावर हा निकाल अपेक्षित नाही. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल आला तर सर्वोच्च न्यायालयात तो टिकणार नाही. वरून जे लिहून पाठवलं आहे तो निकाल येणंच अपेक्षित आहे. कायद्यानुसार किंवा कायद्याच्या चौकटीतील निकालाची अपेक्षा नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘निकाल तोंडावर असतात. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांकडे जातात कारण त्यांचा प्रोटोकॉल मोठा असतो. पण जर न्यायधीशाच्या भूमिकेत असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच आरोपींकडे (एकनाथ शिंदे) जात असतील तर हे चुकीचं आहे. निकालाच्या पूर्वी जाऊन ही भेट होणं हे प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे. ‘