Vijay Wadettiwar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर…, विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Nov 20, 2023 | 12:30 PM

देशात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं मोठं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

परभणी, २० नोव्हेंबर २०२३ : देशात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं मोठं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. इतकंच नाही तर मंदिरातील दान पेट्या काढल्या तर पुजारी पळून जातील, असे वक्तव्य विजय वडेट्टीवर यांनी परभणी येथे केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. परभणी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाऊंडेशनच्या वतीने थायलंड येथील पंचधातूच्या सहाफुटी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Nov 20, 2023 12:30 PM
फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण दिशाभूल, पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हटले?
छत्रपती संभाजीनगरमध्ये छगन भुजबळ यांच्या फोटाला कुणी घातला दुग्धाभिषेक? बघा व्हिडीओ