तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर खोचक टीका?

| Updated on: Jun 18, 2024 | 6:11 PM

शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे हे हमीच चर्चेत असतात. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. आता तुकाराम मुंढे हे विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धडाकेबाज नेतृत्व आणि त्यांच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे हे हमीच चर्चेत असतात. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. आता तुकाराम मुंढे हे विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. तुकाराम मुंढे यांची सातत्याने बदली होत असते. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली करत आहे तर कायद्यात दुरुस्ती करा आणि त्यांना अमेरिकेत किंवा चीनमध्ये त्याची बदली करा, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यांची अमेरिकेत किंवा चीनमध्ये बदली झाल्यास कोणाला त्रासच नको, असेही खोचकपणे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 18, 2024 06:10 PM
‘छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही’, कुणी केला मोठा दावा?
संघ-भाजपच्या बैठकीत अजितदादांवर खापर, भाजपच्या निशाण्यावर दादा?, शिंदे गटाच्या टार्गेटवर भुजबळ?