चंदा घेऊन धंदा करणं भाजपचं काम, काँग्रेसच्या बड्या नेत्याची सडकून टीका
सध्या राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजप युतीची चांगलीच चर्चा आहे. मात्र अद्याप कोणाताही अंतिम निर्णय यावर झालेला दिसत नाही. अशातच विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजप युतीची चांगलीच चर्चा आहे. अशातच विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘राज ठाकरे यांच्यावर एक तरी द्या हो अशी म्हणायची वेळ आली आहे’, अशी टीका त्यांनी केली. तर रामटेकची जागा काँग्रेस जिंकणार. समोर उमेदवार कोणीही असू दे, धक्कादायक निकाल असेल. भाजपच्या अधपतानाची सुरुवात महाराष्ट्रमधून होईल, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. पुढे ते असेही म्हणाल्या, चंद्रपूर ही 100 टक्के जिंकणारी जागा आहे. पूर्वी काँग्रेसचा एक खासदार होता, आता 20 खासदार निवडून येतील. त्याची सुरूवात चंद्रपुरातून होईल. हायकमांडला अपेक्षित असा निर्णय होईल. राज्यात किंवा दिल्लीत माझी गरज असेल तर तसा निर्णय होईल, असे ते म्हणाले. यावेळी भाजपवर हल्लाबोल करत चंदा घेऊन धंदा करणे हे भाजपचे काम असल्याचे त्यांनी म्हटले.