आरोग्याचं कारण देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार? कुणी केला मोठा दावा?

| Updated on: Aug 14, 2023 | 4:48 PM

VIDEO | 'आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न', काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला खळबळजनक दावा

गडचिरोली, १४ ऑगस्ट २०२३ | पुण्यातील चांदणी चौक उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहू शकले नव्हते. शिंदे यांच्या आजारावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्याने ते साताऱ्यातील आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले होते, असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला जाईल. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही खेळी असावी असा कयास वडेट्टीवार यांनी लगावला. तर दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्याचं कारण देत शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्ली हायकमांडचा प्रयत्न सुरू आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 14, 2023 04:44 PM
नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवास होणार अधिक सुखकर
‘खरा मुख्यमंत्री कोण हे येत्या २-३ दिवसांत कळेल’, आदित्य ठाकरे यांनी काय केला मोठा गौप्यस्फोट?