Viay Wadettiwar | सुप्रीम कोर्टाचा निकाल ओबीसींच्या बाजूनं लागेल अशी खात्री : विजय वडेट्टीवार

| Updated on: Dec 15, 2021 | 11:13 AM

मदत व पूनर्वसन मंत्री आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूला येईल याचा विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

मदत व पूनर्वसन मंत्री आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आजचा निर्णय ओबीसी समाजाच्या बाजूला येईल याचा विश्वास असल्याचं म्हटलं आहे. आम्ही काढलेला अध्यादेश इतर राज्यांनीही काढला आहे. आज आलेला निर्णय संपूर्ण देशासाठी असेल, जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. देशातंच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असंही ते म्हणाले. समजा आजचा निकाल ओबीसी समाजाच्या बाजूने लागला नाही, तर राज्य सरकारने इम्पेरीकल डाटा गोळा करण्याचं काम सुरु करुन आरक्षणाचा निकाल येईपर्यंत निवडणूका घेऊ नयेत, अशी भूमिका घेतली.केंद्र सरकारमुळे ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गेलं, इम्पेरीकल डाटा दिला तर प्रश्न सुटेल. मध्य प्रदेशमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झालीय, असं वडेट्टीवार म्हणाले.

Pune | काही महिन्यांपूर्वी जर स्वप्नीलचे यादीत नाव असते तर तो आज आमच्यात असता, वडिलांची प्रतिक्रिया
Nawab Malik | चंद्रकांत पाटलांनी शिवरायांच्या नावाचं राजकारण केलं : नवाब मलिक