Vijay Wadettiwar | मुंबई लोकलवर सध्या निर्बंध लावण्याचा विचार नाही, विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं कारण
मुंबई लोकलवर निर्बंध लादल्याने अनेकांच्या नोकऱ्यावर गदा येतील, त्यामुळे लोकलवर निर्बंध लादण्याचा सध्या विचार नाही. शाळाही बंद होणार नाहीत, असं वडेट्टीवार म्हणाले.
“अधिकारी आणि प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असं मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. सध्या महाराष्ट्रात कुठलेही निर्बंध लावण्याचा विचार नाही. मुंबई लोकलवर निर्बंध लादल्याने अनेकांच्या नोकऱ्यावर गदा येतील, त्यामुळे लोकलवर निर्बंध लादण्याचा सध्या विचार नाही. शाळाही बंद होणार नाहीत, असं वडेट्टीवार म्हणाले. पण, शाळेत कोविडचे नियम पाळणे गरजेचं आहे” असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना विलीगीकरण अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.