राज ठाकरे हा वाघ माणूस पण त्यांना कोल्हा…, सत्ताधाऱ्यांवर कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Apr 09, 2024 | 3:20 PM

राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाही असे सांगत होते पण त्यांना दिल्लीची वारी करावी लागली यात कुठेतरी राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम आणि त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचा काम होत आहे का? अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज ठाकरे दिल्लीसमोर झुकणार नाही अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे. राज ठाकरे हा वाघ माणूस आहे, पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाही असे सांगत होते पण त्यांना दिल्लीची वारी करावी लागली यात कुठेतरी राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम आणि त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचा काम होत आहे का? अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. तर राज ठाकरेंची आजची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्याविरोधात नसेल, असा कयास आहे. राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे. म्हणून आज जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले, दिल्लीश्वरा पुढे झुकणारे नसेल असे वाटते, असं वक्तव्य करत विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

Published on: Apr 09, 2024 03:04 PM
सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉट रिचेबल, कार्यालयाबाहेर शुकशुकाट, नेमकं काय घडतंय?
सगळ्यांना पुरुन उरणार…, विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांची सोशल मिडीयावर पोस्ट काय?