शिवानी वडेट्टीवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
VIDEO | भाजप आक्रमक झालेल्या शिवानी वडेट्टीवार यांच्या 'त्या' वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले बघा
नागपूर : महाराष्ट्रातीलच काँग्रेसचा बड्या नेता विजय वडेट्टीवार यांच्या कन्येनं वीर सावरकरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं विजय वडेट्टीवार यांनी आज समर्थन केलंय. शिवानी यांनी सावरकरांचं एक पुस्तक वाचून हे वक्तव्य केलंय. यावर तीच खुलासा करेल. भाजपने आरोप करण्यापूर्वी आधी संपूर्ण सावरकर वाचावा, असं आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केलंय. ते म्हणाले, ‘ मी शिवानीला विचारलं. ती म्हणाली, सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक ‘सहा सोनेरी पानं..’ याचा रेफरन्स घेऊन ती बोलली. तसं असेल तर त्यात वाद होण्याचा विषय नाही. मत-मतांतरं असू शकतात. मला तो रेफरन्स माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Apr 15, 2023 12:06 PM