VIDEO : आमच्यात सगळं साम्य होतं, पण विलासरावांना माझ्यासारखं लव्हमॅरेज काही जमलं नाही, गोपीनाथ मुंडेंचं संग्रहित भाषण

| Updated on: Aug 14, 2021 | 10:13 AM

सरपंच ते मुख्यमंत्री अशी कारकीर्द असणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा आज स्मृतिदिन आहे. वयाच्या 29 व्या वर्षी विलासराव लातूर (Latur) येथील बाभळगावचे सरपंच झाले.

सरपंच ते मुख्यमंत्री अशी कारकीर्द असणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा आज स्मृतिदिन आहे. वयाच्या 29 व्या वर्षी विलासराव लातूर (Latur) येथील बाभळगावचे सरपंच झाले. 1974 ते 1980 दरम्यान लातूर पंचायत समितीच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार पाहिला.

1980 ते 1995 पर्यंत सलग तीनदा विधानसभेवर आमदार (Maharashtra Vidhan Sabha) झाले. 1995 मध्ये पराभूत झाले. मात्र 1999 ला परत विधानसभेवर परतले.

18 ऑक्टोबर 1999 ते 17 जानेवारी 2003 पर्यंत विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहिली. नोव्हेंबर 2004 मध्ये विलासराव देशमुख दुसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. दोन वेळेस महाराष्ट्राचे, मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रात मंत्री अशी विलासरावांची कारकीर्द होती.

विलासराव देशमुख आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे दोघे विरोधी पक्षात असले तरी त्यांच्या मैत्रीचे किस्से आजही चर्चेत असतात. एका कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या मैत्रीचे भन्नाट किस्से सांगितले.

Sanjay Rathod | संजय राठोड यांच्यावरच्या आरोपांची एसआयटी चौकशी
Independence Day | CSMT, मंत्रालय, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक रोषणाई