Special Report | विनायक मेटेंचा अपघात रोड हिप्नोसिसमुळं ?
या स्थितीत संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू जे पाहतो, ते रेकॉर्ड करत नाही. नकळत नजर शून्यात जाते आणि वाहनावरचा ताबा सुटतो. रोड हिप्नोसिस हे उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचं पहिलं कारण आहे. अपघात होण्याच्या 15 मिनिट आधी ड्रायव्हरला काहीही आठवत नाही. तो किती किलोमीटर वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग किती आहे याचं तो विश्लेषण करु शकत नाही. विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात याही कारणामुळं झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
मुंबई : विनायक मेटेंचा(Vinayak Mete) ड्रायव्हर रोड हिप्नोसिसचा( road hypnosis) शिकार झाला का? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं. मेटेंच्या गाडीचा अपघात नेमका कशामुळं झाला?ड्रायव्हरला झोप लागली का? यामागे काही घातपात तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. मेटेंच्या याच अपघाताबद्दल आता आणखी एक शक्यताही वर्तवण्यात येतेय. ती शक्यता आहे रोड हिप्नोसिसची. रोड हिप्नोसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, जी बहुतेक ड्रायव्हर्सच्या लक्षात येत नाही. रस्त्यावर जवळपास अडीच तास गाडी चालवल्यानंतर ही स्थिती सुरु होते. या स्थितीत संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू जे पाहतो, ते रेकॉर्ड करत नाही. नकळत नजर शून्यात जाते आणि वाहनावरचा ताबा सुटतो. रोड हिप्नोसिस हे उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचं पहिलं कारण आहे. अपघात होण्याच्या 15 मिनिट आधी ड्रायव्हरला काहीही आठवत नाही. तो किती किलोमीटर वेगाने जात आहे, किंवा त्याच्या समोरच्या कारचा वेग किती आहे याचं तो विश्लेषण करु शकत नाही. विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात याही कारणामुळं झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
रोड हिप्नोसिसपासून वाचण्यासाठी चालकांनी काय करायला पाहिजे
दर अडीच तासांनी गाडी थांबवणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काही ठिकाणं आणि वाहनं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटात काहीही आठवत नसेल, तर तुम्ही धोक्यात आहात असं समजायला हवं. गाडीतले इतर प्रवासी झोपलेले असल्यास याचा धोका अधिक असतो. त्यामुळं काही काळानं गाडी थांबवणं आणि फ्रेश होणं आवश्यक आहे.
विनायक मेटेंचा अपघात नेमका कशामुळं झाला हे तपासाअंती समोर येईलच. लेन कटिंग, ओव्हरस्पीडमुळं अपघात होतातच. पण रोड हिप्नोसिसकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळं रात्रीच्या वेळेस महामार्गावरुन गाडी चालवताना सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.