Vinayak Raut | नारायण राणेंची कुंडली आमच्याकडे आहे, ती बाहेर काढू, विनायक राऊत यांची टीका

| Updated on: Oct 20, 2021 | 4:56 PM

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

विनायक राऊत यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रहारमध्ये काय छापून येणार ते बघू. पण ते स्वतः चिखलात बुडालेले आहेत, असं सांगतानाच आम्हीही राणेंचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Nawab Malik | एनसीबीच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
Jacqueline Fernandez | मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची चौकशी, नेमकं प्रकरण काय आहे?