‘शशिकांत वारिसेची हत्या करणारा राणे यांच्या सोबत राहणारा गुंड’, विनायक राऊत यांचा थेट आरोप

| Updated on: Feb 11, 2023 | 12:03 PM

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून रिफायनरी विरोधात आणि दलालांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांपैकी एक असणारे शशिकांत वारिसे यांच्या ज्या पद्धतीने घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याचा धिक्कार करत असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. कोणत्याही रिफायनरीच्या अमिषाला बळी न पडता एक गरिब पत्रकार अशी ओळख वारिसे यांची होती. त्यांच्याच कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यास […]

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून रिफायनरी विरोधात आणि दलालांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांपैकी एक असणारे शशिकांत वारिसे यांच्या ज्या पद्धतीने घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याचा धिक्कार करत असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. कोणत्याही रिफायनरीच्या अमिषाला बळी न पडता एक गरिब पत्रकार अशी ओळख वारिसे यांची होती. त्यांच्याच कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यास जात असताना विनायक राऊत यांनी वारिसेंच्या हत्येचा पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा, अशी मागणी केली. रिफायनरीच्या पैशांवर पोसणारे अशा सराईत गुंडांची जबाबदार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे. या हत्येमागे थेट राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावेच लागले, असेही विनायक राऊत म्हणाले.

Published on: Feb 11, 2023 12:03 PM
महत्त्वाच्या लोकांच्या हत्या होताहेत, सरकार काय झोपा काढतंय काय?; अजित पवार यांचा सवाल
राज्यपाल कोश्यारीजी, आधी माफी मागा अन् मगच कोल्हापुरात पाय ठेवा; ठाकरेगट आक्रमक