औरंगाबादेत कोरोना नियमांचे उल्लंघन; बाबा पेट्रोल पंप सील
कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शहरातील बाबा पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा पेट्रोल पंप सील करण्याबाबत आदेश दिले.
औरंगाबाद – कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शहरातील बाबा पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा पेट्रोल पंप सील करण्याबाबत आदेश दिले. लस न घेतलेल्या लोकांना पेट्रोल देऊ नका असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते, मात्र हा आदेश न पाळता बाबा पेट्रोल पंपावर सरसकट वाहनधारकांना पेट्रोल दिले जात होतं, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आहे टीव्ही 9 चे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी.