‘अहो कशाला कुटाणे वाढवताय…’ असंच म्हणाले असावेत बहुतेक अजित पवार !
गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये मोठ्या नेत्यांना तलवारी भेट देणं आणि त्यांनी त्या तलवारी म्यानातून काढून उंचावून दाखवणं हे प्रकार सामान्य झाल्याइतके नियमितपणे घडू लागले आहेत. त्यावरून प्रसंगी वाद देखील ओढवले असून याचसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पाडवा मेळाव्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला आहे.
मुंबई: आज मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका कार्यक्रमात पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चक्क भेट मिळालेली तलवार म्यानातून काढायला नकार दिला! भाजपाचे मुलुंडमधील दिवंगत नेते आणि माजी आमदार सरदार तारासिंग यांचे नातू गुरुज्योत सिंग यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला. यावेळी स्टेजवर अजित पवारांच्या शेजारी येताच गुरुज्योत सिंग यांनी अजित पवारांना भेट म्हणून द्यायला आणलेली तलवार पुढे केली आणि अजित पवारांनी ती बाहेर काढायला नकार दिला. या प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.यात ज्याप्रकारे अजित पवार नकार देतायत, अहो कशाला कुटाणे वाढवताय असं म्हणतायत कि काय असा प्रश्न पडतोय. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये मोठ्या नेत्यांना तलवारी भेट देणं आणि त्यांनी त्या तलवारी म्यानातून काढून उंचावून दाखवणं हे प्रकार सामान्य झाल्याइतके नियमितपणे घडू लागले आहेत. त्यावरून प्रसंगी वाद देखील ओढवले असून याचसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात पाडवा मेळाव्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला आहे.