सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
लोकसभा निवडणूक लढण्यावर विशाल पाटील हे ठाम आहेत. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असून अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलंय.
निवडणुकीतून माघार घेण्यासाठी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही. तर लोकसभा निवडणूक लढण्यावर विशाल पाटील हे ठाम आहेत. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असून अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं. यावेळी विशाल पाटलांना देखील चिन्ह मिळालं. तर अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवणाऱ्या विशाल पाटील यांनी निवडणूक आयोगाकडून ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आलं. त्यामुळे विशाल पाटील आता लिफाफा या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढताना दिसणार आहेत. तर विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल करताना त्यांनी शिट्टी, टेबल आणि गॅस सिलिंडर ही चिन्हे मागितली होती. विशाल पाटील यांनी मागितलेल्या पैकी चिन्ह विशाल पाटलांना मिळालं नाही. विशाल पाटील यांना ‘लिफाफा’ चिन्ह मिळालं आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना ‘शिट्टी’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.