Pandharpur | श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल, रुक्मिणीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट

| Updated on: Aug 23, 2021 | 8:18 AM

आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट मुंबई येथील विठ्ठल भक्त शशिकांत मढवी यांनी केलीय.

आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट मुंबई येथील विठ्ठल भक्त शशिकांत मढवी यांनी केलीय. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागांना गुलछडी, गुलाब, शेवंती, ग्लेंडर, निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे, पिवळा झेंडु , कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.

Maharashtra Rain Update | राज्यात पुन्हा पावसाची दडी, पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा ब्रेक
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 23 August 2021