VIDEO : R. R Patil यांचे सुपुत्र Rohit Patil यांच्या विजयाचं Uday Samant यांच्याकडून कौतुक

| Updated on: Jan 19, 2022 | 2:24 PM

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची राजकारणात दणक्यात एन्ट्री झाली आहे. सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांना नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. तसेच रोहित पाटील यांचे कौतुक उदय सामंत यांनी देखील केले आहे.

दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची राजकारणात दणक्यात एन्ट्री झाली आहे. सांगलीतील कवठेमहंकाळमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांना नेत्रदीपक विजय मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. तसेच रोहित पाटील यांचे कौतुक उदय सामंत यांनी देखील केले आहे. या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो आणि आज मी माझ्या वडिलांना खरंच मीस करतोय, असं म्हटलंय. आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता, असं त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

VIDEO : Beed Election Result 2022 |बीडच्या निवडणुकीतील विजयाचं श्रेय Pankaja Munde यांना आहे-Suresh Dhas
VIDEO: Nagar Panchayat Election Result 2022 | नगरपंचायत निवडणुकीवर Nawab Malik यांची प्रतिक्रिया