Special Report | स्थगित 27 % ओबीसी जागांवर 18 जानेवारीला मतदान
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असतानाच, ओबीसींच्या खुल्या प्रवर्गात टाकलेल्या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. तर इतर 73 टक्के जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे.
राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असतानाच, ओबीसींच्या खुल्या प्रवर्गात टाकलेल्या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. तर इतर 73 टक्के जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशीही मागणी करण्यात येत आहे मात्र निवडणुक आयोगाने वेळापत्रकात एवढाच बदल केला आहे. त्यामुळे निवडणुका ठरलेल्या तारखेलाच होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
सर्वच राजकीय पक्ष जोमाने रिंगणात
या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुका आणखी रंगतदार होणार आहेत. ओबीसी आरक्षणाचा पेच असल्यामुळे काही ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचीही शक्यता आहे. तर बहिष्कार टाकण्याऐवजी भाजपला मतदान करू नका असे आवाहन भुजबळांनी केल्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.