कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, निकालाची उत्सुकता; कधी होणार मतमोजणी?
चिंचवडमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 41,1 टक्के तर कसब्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाल्याची नोंद
पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं आहे. कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक रिंगणात होते. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत पाहायला मिळाली. चिंचवडमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 41,1 टक्के मतदान पार पडलं तर कसब्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. दरम्यान आता कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान संपलं असून आता याच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी आणि निकाल 2 मार्च रोजी लागणार आहे.
Published on: Feb 26, 2023 06:38 PM