‘ती’चे कपडे उतरवले…अश्लील हावभाव अन् लोकांनी पैसे उधळले, नेमका काय घडला प्रकार?
भंडाऱ्यातील नग्न डान्सच्या प्रकरणानं महाराष्ट्राने बिहारला मागे टाकलं. भंडाऱ्यात एका कार्यक्रमात मुलीचे कपडे उतरवून अश्लील डान्स. हे सारं होताना लोकं पैसे उधळत होते. हा सगळा धक्कादायक प्रकार १७ तारखेला घडला आणि याबाबत सोशल मीडियावर बोंब उठल्यानंतर २१ तारेखेला या प्रकरणावर कारवाई
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : भंडाऱ्यात एका कार्यक्रमात मुलीचे कपडे उतरवून अश्लील डान्सचा प्रकार समोर आला. हे सारं होताना लोकं पैसे उधळत होते. हा सगळा धक्कादायक प्रकार १७ तारखेला घडला आणि याबाबत सोशल मीडियावर बोंब उठल्यानंतर २१ तारेखेला या प्रकरणावर कारवाई केली. भंडाऱ्यातील नग्न डान्सच्या प्रकरणानं महाराष्ट्राने बिहारला मागे टाकलं. भंडाऱ्यात नाकाडोंगरी येथे १७ तारखेला हंगामा नावाचा कार्यक्रम झाला. यामध्ये डान्ससाठी काही मुलींना बोलवण्यात आलं होतं. ज्यावेळी कार्यक्रम सुरू होणार त्यावेळी काहींनी या मुलींचे कपडे काढले आणि धक्कादायक म्हणजे बघ्यांनी फक्त पैसे उधळले. जमलेला जमाव शिट्ट्या मारत होतं. धक्कादायक म्हणजे हा घडलेला प्रकार मोबाईलमध्ये शूट झाल्याने समोर आला. तो पर्यंत त्याची कुठेच वाच्छता नव्हती. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर टीका झाली.