Nawab Malik| वानखेडेंच्या आई अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू?- मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे. “आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्रं शेअर केली आहेत.

काय आहेत कागदपत्रं?
महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.