Waqf Board on Raj Thackeray : लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, राज ठाकरेंच्या पोस्टवर म्हणाले…
लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील तळेगावातील तब्बल ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचे समोर आले आहे. इतकंच नाहीतर वक्फ बोर्डाकडून याबद्दल लातूरच्या शंभूरहून अधिक शेतकऱ्यांना नोटीस बजावली.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांना ज्या नोटीसेस मिळाल्या, त्या नोटीस महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून देण्यात आलेल्या नाहीत. एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्युनल कोर्टात जागेबाबत दावा दाखल केलेला आहे तिथून या नोटीस जारी करण्यात आल्या आहेत, असं स्पष्टीकरण वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी दिलं. लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील तळेगावातील तब्बल ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितल्याचे समोर आले आहे. इतकंच नाहीतर वक्फ बोर्डाकडून याबद्दल लातूरच्या शंभूरहून अधिक शेतकऱ्यांना नोटीस बजावल्याचीही माहिती मिळतेय, अशातच विरोधाला बळी न पडता वक्फ दुरूस्ती विधेयक आताच मंजूर करून घ्या, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. लातूरमधील एका घटनेचा दाखला देत राज ठाकरे यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली. तर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला महाविकास आघाडीचा विरोध होता, असंही म्हणत वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराला चाप कसा बसणार? असा संतापजनक सवाल राज ठाकरेंनी केला होता. यावरही वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरेंनी जे मत मांडलं ते मांडण्याचा त्यांना अधिकार आहे पण संसदेतील विधेयकावर कोणतंही भाष्य करू शकत नाही, असेही समीर काझी म्हणाले.