Wardha Accident : वर्धा जिल्ह्यात कार पुलावरुन कोसळून मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू
चारचाकी एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात (Major Accident in Wardha) झाला आहे. अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळंतय.
चारचाकी एक्सयुव्ही (SUV Car) वाहनावरून नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात (Major Accident in Wardha) झाला आहे. अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू ) झाल्याचं कळंतय. देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला आहे. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.