Wardha Flood Impact: वर्धा जिल्ह्यातील महापुराच्या वेदना, पहा आढावा
वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच भागात पूर ओसरला आहे. परंतु पुराने दिलेल्या जखमा भरून निघायला बरीच वर्षे लागणार आहेत. पूर ओसरला असला तरी जमीन खरडून निघाली आहे, पिकं वाहून गेली आहेत.
वर्धा जिल्ह्यातील बऱ्याच भागात पूर ओसरला आहे. परंतु पुराने दिलेल्या जखमा भरून निघायला बरीच वर्षे लागणार आहेत. पूर ओसरला असला तरी जमीन खरडून निघाली आहे, पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. अजूनही काही भागात पूरपरिस्थिती कायम आहे. सुपीक माती वाहून गेल्याचं दु:ख शेतकऱ्यांनी मांडलं. दुबार पेरणीनंतरही मोठा फटका बसल्याचं शेतकरी सांगत आहेत. जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जुलैमध्ये मात्र थैमान घातलं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका वर्धा जिल्ह्याला बसला असून 42 गावांचा संपर्क तुटला आहे. दक्षिण गडचिरोलीतील गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, वैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.