Breaking | वसिम रिझवी यांनी आज इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला
शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी इस्माल धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Gaziabad) येथील डासना मंदिरात यति नरसिंहानंद सरस्वती यांनी वसीम यांना सनातन धर्माची दीक्षा दिली.
शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी (Wasim Rizvi) यांनी इस्माल धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Gaziabad) येथील डासना मंदिरात यति नरसिंहानंद सरस्वती यांनी वसीम यांना सनातन धर्माची दीक्षा दिली. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर लगेच वसीम रिझवी यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, मला इस्लाममधून (Islam)बहिष्कृत करण्यात आले आहे. माझ्यावर दर शुक्रवारी इनाम ठेवले जात होते. आज मी सनातन धर्म (Sanatan ) स्वीकारत आहे. यति नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, वसीम रिझवी त्यागी जातीत प्रवेश करतील. त्यांचे नवे नाव जितेंद्र नारायणसिंह त्यागी असे ठेवण्यात आले आहे.