Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागर बंगल्यावर बाप्पासमोर हात जोडले! फडणवीसही शेजारीच उभे

| Updated on: Sep 09, 2022 | 1:41 PM

सागर बंगल्यावर फडणवीस यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गणपती बाप्पासोबत हात जोडून मनोभावे प्रार्थना केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी तिथेच उपस्थित होते. हाताची घडी घालून देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर (Sagar Bunglow) या शासकीय निवासस्थानी जाऊन गणेशोत्सवानिमित्त भेट दिली. गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सागर बंगल्यावर फडणवीस यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गणपती बाप्पासोबत हात जोडून मनोभावे प्रार्थना केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी तिथेच उपस्थित होते. हाताची घडी घालून देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय. यावेळी ते इतर उपस्थित पाहुण्याचंही स्मित हास्य करत स्वागत करताना दिसून आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिंदे गटाचे नियुक्त केलेले शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.

Published on: Sep 09, 2022 01:41 PM
ढोल ताशांच्या गजरात कोल्हापुरातील मानाच्या गणपतीचं विसर्जन
विसर्जन मिरवणुकीत भावना गवळींनी धरला ठेका