Python Video : मुंबई गोवा हायवेजवळील घरात अजगर आढलल्यानं खळबळ! पाहा अजगराला पकडण्याचा थरारक व्हिडीओ

| Updated on: Aug 11, 2022 | 12:34 PM

घरात रात्रीच्या सुमारास अजगर शिरला होता. नर जातीच्या अजगरची लांबी नऊ फूट होती.

मुंबई गोवा महामर्गारील (Mumbai Goa Highway) दासगाव येथील गणेशनगर प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारील रहात सलेल्या अमिताभ जाधव (Amitabh Jadhav) यांच्या घरात रात्रीच्या सुमारास अजगर शिरला होता. नर जातीच्या अजगरची लांबी नऊ फूट होती. पावसामुळे तो लोकवस्तीत आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याची माहिती आजूबाजूच्या परिसरामध्ये समजताच सर्पमित्र अनिश कासेकर व त्यांचे सहकारी अनिकेत कर्जावकर यांनी मिळून त्या अजगर (Huge Python) सापाला पकडलं. त्यानंतर या अजगराला नैसर्गिक आदिवासात सुखरूप सोडून देण्यात आलं. रात्रीच्या वेळी हे अजगराचं रेस्क्यू करत त्याला जीवदान देण्यात आलं.

VIDEO | Bhandara Vainganga River | भंडाऱ्यातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
रुपाली चाकणकरांच्या घरी रंगला रक्षाबंधन सोहळा