BMC Water Problem: पाणी जपून वापरा… मुंबईसह ‘या’ भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात

| Updated on: Dec 01, 2024 | 10:58 AM

आजपासून येत्या पाच डिसेंबरपर्यंत दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये आज बिघाड झाल्याने १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर पाणी जपून वापरण्याचे पालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबई शहर – उपनगर, ठाणे आणि भिवंडी भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. कारण आजपासून येत्या पाच डिसेंबरपर्यंत दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये आज बिघाड झाल्याने १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. तर पाणी जपून वापरण्याचे पालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान, यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममध्ये आज बिघाड झाला आहे. हे तांत्रिक दुरुस्तीचे काम ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर – उपनगर, ठाणे व भिवंडी भागाला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे’, अशी माहिती पालिकेने दिली आहे तर दिनांक ०१ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०५ डिसेंबर २०२४ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १०% कपात करण्यात येणार आहे. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने, जपून वापरावे, असे आवाहनही करण्यात आलंय.

Published on: Dec 01, 2024 10:58 AM