अमरावती, अकोला अन् बुलढाण्याचा पाणीप्रश्न मिटणार, नितीन गडकरी यांच्याकडून बोराळामध्ये पाहणी
VIDEO | अमरावती जिल्ह्यातील बोराळामध्ये गोड्या पाण्याचा प्रायोगिक प्रकल्प
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. खाऱ्या पाण्याला गोड पाण्यात रूपांतर करणारा हा पहिला प्रायोगिक प्रयोग असून या प्रयोगामुळे अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील ८९४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, या प्रकल्पाला प्रायोगिक तत्वावर शासनाने दीड कोटी रुपये दिले आहेत. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर या तीन जिल्ह्यांमध्ये साडेनऊशे अशा प्रकारचे प्रकल्प उभारून हा जिल्हा खालपान मुक्त होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामुळे जमिनीपासून केवळ ५० फुटांवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. खारपण पट्ट्यातील खाऱ्या पाण्यामुळे ओलित करणे शक्य नव्हते मात्र या प्रकल्पामुळे आता खारपण पट्यातील शेतकरी 2 ते 3 पिके घेऊ शकणार आहे. खाऱ्या पाण्यातील झिंग्यांना बाहेर देशात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी झिंग्याच्या शेतीवर भर द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी 50 लाख रुपयाचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पत्र दिले आहे. या ठिकाणी तलाव बांधून खाऱ्या पाण्यातील झिंगे तयार झाले तर संपूर्ण जगात एक्स्पोर्ट करता येईल, येथे शेतकरी समृद्ध होईल असे यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळ यांनी सांगितले