नवी मुंबई विमानतळ धावपट्टीवरून वायू दलाच्या सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग, बघा कसं दिलं वॉटर सल्यूट?

| Updated on: Oct 11, 2024 | 1:01 PM

नवी मुंबईकरांच्या प्रतिक्षेतील असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली. नवी मुंबई विमानतळावरील एक धावपट्टी तयार झाली असून आज त्याची चाचणी घेण्यात आली आहे. विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहे. या विमानतळावरुन मार्च २०२५ महिन्यात देशांतर्गत विमाने सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow us on

नवी मुंबईकर ज्याच्या मोठ्या प्रतिक्षेत होते त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय हवाई दलाचे ‘सी 295’ हे लढाऊ विमान या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँण्डिंग झाले आहे. आज नवी मुंबई विमानतळावरील एका धावपट्टीवरून घेण्यात येणारी चाचणी ही यशस्वी झाल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईकरांच्या प्रतिक्षेतील असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान धावपट्टीवर उतरताच अभिनंदन केले. यावेळी हवाईदलाचे काही अधिकारी देखील या चाचणीच्या वेळी उपस्थित होते. ‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 हे लढाऊ विमानसुद्धा धावपट्टीवर यशस्वीपणे लँड होतानाचा क्षण अनेकांनी याची देही याची डोळा पाहिला आणि आपल्या डोळ्यात साठवला. दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डिंग झाल्यानंतर विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले.