Water Shortage in Mumbai | मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा कारण…

| Updated on: May 09, 2023 | 10:02 AM

VIDEO | मुंबईकरांवर ओढावणार पाणी कपातीचं संकट ? काय आहे कारण ? बघा व्हिडीओ

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट (Water Shortage) ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा २२ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी असल्याने मुंबईत पाणी कपातीचं संकट मुंबईकरांवर ओढवणार असल्याची शक्यता यावरून वर्तविली जात आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा २२ टक्के पाणी साठा उरला असल्याने अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी कमी असल्याने मुंबईतील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

Published on: May 09, 2023 10:02 AM
कर्नाटक निवडणुकीवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना घेरलं, बाळासाहेबांचं नाव घेत साधला निशाणा
…तर ‘ते’ १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य