भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Aug 04, 2024 | 4:50 PM

भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 97 टक्के झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भंडारदरा धरणातून 27 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 97 टक्के झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भंडारदरा धरणातून 27 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर त्या पाठोपाठ निळवंडे धरणाचा साठा देखील 83 टक्क्यावर जाऊन पोहोचल्याने निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सात हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल आहे. या वर्षी पहिल्यांदाच नगर जिल्हयातील धरणातून जायकवाडी धरणाकडे पाणी झेपावलंय…पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 6 वाजता भंडारदरा पाणीसाठा 97 टक्के… विसर्ग 27 हजार क्यूसेक, निळवंडे धरण पाणीसाठा 83 टक्के.. विसर्ग 7 हजार क्यूसेक… मुळा धरण पाणीसाठा 78 टक्के.. विसर्ग अद्याप सुरू नाही.

Published on: Aug 04, 2024 04:50 PM
मृदू कवचाच्या ‘त्या’ दुर्मिळ कासवांना जीवदान; अशा पद्धतीने त्यांना केलं सुरक्षित, बघा व्हिडीओ
Kalyan Dombivli Potholes : हे रस्ते म्हणायचे की चाळण… कल्याण-डोंबिवलीतील या रस्त्याची दुर्दशा एकदा बघाच